दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान

RSS फीड म्हणजे काय?

     हल्ली बर्‍याच आघाडीच्या बातम्या देणार्‍या संकेतस्थळांवर आर.एस.एस. सुविधा उपलब्ध असते. या सुविधेमध्ये संकेतस्थळावर उपलब्ध असणार्‍या विविध बातम्यांबद्दलची माहिती संक्षिप्त स्वरूपात साठवून ठेवतात. या माहितीत बातमीचा मथळा, बातमीबद्दलचे थोडक्यात वृत्त व बातमीची मार्गिका (लिंक) इत्यादींचा समावेश होतो. हि संक्षिप्त माहिती एका विशिष्ठ स्वरूपातच उपलब्ध करावी लागते व या स्वरूपाच्या करण्यात आलेल्या सामायिकीकरणाला (स्टँडर्डायझेशन) संकेतस्थळ परिभाषेत `रिअली सिंपल सिंडिकेशन' असे नाव देण्यात आले आहे. संकेतस्थळे आपल्या आर.एस.एस. फीडची मार्गिका वाचकांसाठी उपलब्ध करून देतात. आर.एस.एस. फीड संकेतस्थळावर उपलब्ध असल्यास ते या चिन्हाने (आयकॉन) दर्शवितात. दैनिक सनातन प्रभातच्या आर.एस.एस. फीडची मार्गिका http://www.sanatan.org/marathi/dainik/rss/rss.xml अशी आहे.

आर.एस.एस. फीड कसे वाचावे?

आर.एस.एस. फीडमधील माहिती वाचण्याकरिता वापरण्यात येणार्‍या प्रणालीला `आर.एस.एस. रिडर' किंवा `फीड रिडर' किंवा `अँग्रीगेटर' असे म्हणतात. वाचक आपल्या पसंतीच्या विविध संकेतस्थळांवरील आर.एस.एस. फीडच्या मार्गिका आर.एस.एस. रिडरमध्ये साठवून ठेवू शकतात व एकाचवेळी विविध संकेतस्थळांवरील दैनिकातील बातम्या एका ठिकाणी वाचू शकतात. आर.एस.एस. फीडमध्ये माहिती संक्षिप्त स्वरूपात असल्यामुळे वाचकाला पूर्ण बातमी वाचायची असल्यास रिडरमध्ये मूळ संकेतस्थळावर जाण्यासाठी मार्गिका उपलब्ध असते. या रिडरचे वैशिष्ठ्य म्हणजे ठराविक कालावधीनंतर हा रिडर मूळ संकेतस्थळाच्या आर.एस.एस. फीड मार्गिकेवर काही नवीन बातम्या उपलब्ध आहेत का हे तपासून त्या वाचकास उपलब्ध करून देतो. त्यामुळे वाचकाला ताज्या बातम्या मूळ संकेतस्थळावर उपलब्ध झाल्याबरोबर रिडरवर आपोआप मिळतात. अशाप्रकारचे बरेच आर.एस.एस. रिडर विनामूल्य वापरण्यासाठी माहितीजालावर (इंटरनेट) उपलब्ध आहेत. `गुगल रिडर' हे त्यातीलच एक आहे. या सुविधांमुळे आर.एस.एस. फीड हे माहितीजालावर चांगलेच प्रसिध्द होत आहे.

दैनिक सनातन प्रभातच्या ऑनलाईन आवृत्तीच्या वाचकांनी या सुविधेचा जरूर वापर करावा. याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास किंवा तांत्रिक अडचणी असल्यास dainik@sanatan.org या संपत्रावर संपर्क साधावा हि विनंती.

संपर्कदैनिक मुख्य पानमराठी मुख्य पान
Copyright © 2008 - दैनिक सनातन प्रभात