जपानी मेंदूज्वर लसीकरण आणि काँग्रेसचा हलगर्जीपणा !
नियमित उद्भवणारे आजार, त्या आजारावर मात करण्यासाठी शासनामार्फत राबवण्यात येणार्या निष्फळ योजना व या योजनांच्या माध्यमातून उघड होणारा शासनाचा भोंगळ कारभार, याचे प्रत्यंतर दरवर्षीच येते. गेली ६२ वर्षे देशावर राज्य करणार्या काँग्रेसच्या या भोंगळ कारभाराचे ताजे उदाहरण म्हणजे गोवा राज्यात सध्या राबवण्यात येत असलेली जपानी मेंदूज्वर लसीकरण चळवळ !
विस्तारीत वृत्त...
सर्वत्र साक्षीभावाने पहाण्यापेक्षा नामजप महत्त्वाचा; कारण साक्षीभावाने पहाण्यात द्वैत कायमचे रहाते, तर नामजप करत साधक अद्वैताकडे जाऊ शकतो.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `संत भक्तराज महाराज यांची शिकवण')
धर्मशिक्षण
धर्मशिक्षण : कपडे कसे असावेत ?
कपडे वापरण्याच्या संदर्भात काही व्यावहारिक सूचना
तोकड्या कपड्यांमधून रज-तम लहरींचे प्रक्षेपण होऊन आजूबाजूच्या भिन्न लिंगी व्यक्ती व वाईट शक्ती आकृष्ट होऊन व्यक्तीला त्रास होणे अ. `अंगभर वस्त्रे धारण केल्यामुळे थंडी, वारा, ऊन व पाऊस यांपासून देहाचे संरक्षण होण्याबरोबरच लज्जारक्षणही होते. याउलट तोकडे कपडे घातल्यामुळे शरिराचे संरक्षण होत नाही व लज्जारक्षणही होत नाही. आ. तोकड्या कपड्यांमधून रज-तम लहरींचे प्रक्षेपण होऊन आजूबाजूच्या भिन्न लिंगी व्यक्तींच्या वासना जागृत होतात. इतरांच्या वासना जागृत करण्याचे पातक तोकडे कपडे घालणार्या व्यक्तीला लागते. इ. तोकड्या कपड्यांमधून होणार्या अंगप्रदर्शनामुळे वायूमंडलात वावरणार्या वाईट शक्तींच्या लिंगदेहांमधील वासना जागृत होऊन त्या वाईट शक्ती असे कपडे घालणार्या व्यक्तीकडे आकृष्ट होतात. त्यामुळे त्या व्यक्तीला वाईट शक्तींचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हिंदु धर्मात संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे अंगभर वस्त्र परिधान करण्यास सांगितले आहे.' - ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून) (संदर्भ : सनातनचा ग्रंथ `कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?')